कॅप्टन दीपक सिंग यांना वीरमरण

0
11

>> जम्मू-काश्मीरातील चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरमधील डोडा येथे बुधवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे कॅप्टन दीपक सिंग यांना वीरमरण आले. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत कॅप्टन दीपक सिंग यांच्या रुपाने भारतमातेने आपला सुपुत्र गमावला. या चकमकीत 4 दहशतवादी देखील ठार झाले.
शहीद कॅप्टन दीपक हे 48 राष्ट्रीय रायफल्सचे असल्याचे लष्कराने सांगितले. डोडा येथील असार वनक्षेत्रात सुरू असलेल्या चकमकीत ते टीमचे नेतृत्व करत होते. बुधवारी सकाळी गोळी लागल्यानंतर त्यांना रुग्णालयात आणले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

लष्कराने दिलेल्या माहितीनुसारनुसार, असार वन परिसरात रात्री उशिरापर्यंत चकमक सुरू होती. दहशतवादी जंगलात एका नदीजवळ लपून गोळीबार करत आहेत. सकाळी झालेल्या चकमकीदरम्यान ते पळून गेले होते, तिथून तीन बॅगमध्ये एम-4 रायफल आणि काही स्फोटकेही सापडली होती.