कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर हल्ला; मोदींकडून निषेध

0
5

कॅनडाच्या ब्रॅम्प्टन भागामध्ये एका हिंदू मंदिरावर खलिस्तानवाद्यांनी हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी घडला. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटू लागले. कॅनडाच्या ब्रेम्प्टन भागात हिंदू सभा मंदिरात काही हिंदू भाविक प्रार्थना करत असताना त्यांच्यावर खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केला. मंदिर परिसरात ही घटना घडल्यानंतर त्यावर हिंदू भाविकांनीही प्रतिकार केला. त्यात जोरदार हाणामारी झाल्याचे समोर आले. कॅनडामध्ये हिंदू मंदिरावर हल्ला झाल्याच्या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कठोर शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. कॅनडातील हिंदू मंदिरावर जाणीवपूर्वक झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांना धमकावण्याचा भ्याड प्रयत्न तितकाच भयंकर आहे. अशाने भारताचा संकल्प कधीही कमकुवत होणार नाही, अशा शब्दांत मोदींनी निषेध व्यक्त केला आहे.