कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांचा अखेर राजीनामा

0
1

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी काल आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे पंतप्रधान म्हणून त्यांचा नऊ वर्षांचा कार्यकाळ संपुष्टात आला. तसेच त्यांनी लिबरल पार्टी ऑफ कॅनडा या पक्षाचे सदस्यत्वही सोडले. देशाला संबोधित करताना त्यांनी ही घोषणा केली.
लिबरल पार्टी ऑफ कॅनडा पक्षात त्यांच्या विरोधात वाढत चाललेल्या मतभेदाच्या पार्श्वभूमीवर जस्टिन ट्रूडो यांनी हे पाऊल उचलले. ओट्टावा येथील रिडो कॉटेज येथील त्यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांनी काल पत्रकार परिषद घेतली. कॅनडामध्ये यावर्षी संसदीय निवडणुका होणार आहेत, ट्रुडो यांच्या राजीनाम्यानंतर नियोजित वेळेपूर्वी निवडणुका घेण्याची मागणी होऊ शकते.

ट्रूडो यांच्यावर त्यांच्या लिबरल पक्षाच्या खासदारांकडून अनेक महिन्यांपासून पायउतार होण्यासाठी दबाव होता. 16 डिसेंबर रोजी कॅनडाच्या उपपंतप्रधान तथा अर्थमंत्री क्रिस्टिया फ्रीलँड यांनी आपले पद सोडल्यानंतर ट्रूडो यांच्यावरील पद सोडण्याचा दबाव आणखी वाढला होता. ट्रुडो यांनी योजनांवर खर्च करण्यासाठी सरकारी तिजोरी खुली केली आहे. त्यांच्या या धोरणावर 56 वर्षीय फ्रीलँड यांनी टीका केली होती.
बुधवारी लिबरल पक्षाची राष्ट्रीय कॉकस बैठक होणार आहे. या बैठकीत ट्रुडो यांना बंडखोरीचा सामना करावा लागू शकतो, असे मानले जात होते. त्यामुळेच या बैठकीपूर्वी ट्रुडो यांनी राजीनामा सादर केला.