
पणजी
सी. कृष्णय्या चेट्टी ज्वेलर्सने आयोजित केलेल्या दागिन्यांचे प्रदर्शन आणि विक्रीचा शुभारंभ काल हॉटेल फिदाल्गो येथे डॉली शर्मा, श्रीनिवास खलप, श्रद्धा खलप, तन्वी वालावलकर यांच्या उपस्थितीत झाला.
सदर प्रदर्शन ग्राहकांसाठी दि. २२ ऑक्टोबर पर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वा. पर्यंत खुले असून दागिने खरेदी आणि घडावळणीवर विशेष सूट देण्यात येणार आहे. तरी ग्राहकांनी याचा लाभ घ्यावा, असे कळविण्यात आले आहे.