सरकारने रविवारी संसदेत संमत केलेली तिन्ही कृषी विधेयके ही भारताची एकविसाव्या शतकाची गरज असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले. विरोधी पक्ष शेतकर्यांची फसवणूक करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. ही विधेयके संमत होणे ही एक ऐतिहासिक घटना असून त्यामुळे भारतीय कृषी क्षेत्रात नवी क्रांती घडेल असे श्री. मोदी म्हणाले. या नव्या कायद्यांमुळे आपल्या हातातील नियंत्रण जाईल याची काही लोकांना चिंता असून त्यामुळे ते किमान हमी दराविषयी शेतकर्यांची दिशाभूल करीत असल्याची खरमरीत टीका पंतप्रधानांनी यावेळी केली.