केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांच्या विरोधात आज सोमवार दि. २८ रोजी गोवा प्रदेश कॉंग्रेस समिती राजभवनवर मोर्चा नेणार असल्याचे काल प्रदेश कॉंग्रेश सरचिटणीस आग्नेल फर्नांडिस यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी विधेयकांच्या निषेधार्थ हा मोर्चा काढण्यात येणार असून दुपारी ३.३० वाजता दोनापावला येथून मोर्चा सुरू होणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना देण्यासाठी एक निवेदन कॉंग्रेसच्यावतीने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना सादर करण्यात येणार आहे, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले. या मोर्चात राज्यातील काही शेतकरीही सहभागी होणार असल्याचे फर्नांडिस म्हणाले.
दरम्यान, निसर्गसुंदर गोव्याचे कोळसा हबमध्ये रुपांतर करण्यास कॉंग्रेसचा विरोध असल्याचे फर्नांडिस यांनी म्हटले आहे.