कृषी खात्याने राज्य पातळीवरील कृषी पुरस्कारांसाठी अर्ज मागविले आहेत. कृषी खात्याकडून कृषी क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी रत्न, कृषी विभूषण, कृषी भास्कर आणि फादर इनासियो आल्मेदा पुरस्कार अशा चार गटात पुरस्कार दिले जातात. कृषी रत्न पुरस्कार 2 लाख रुपये, कृषी विभूषण पुरस्कार 1 लाख रुपये आणि इतर दोन्ही पुरस्कार प्रत्येकी 50 हजार रुपयांचे आहेत. या पुरस्कासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 20 नोव्हेंबर अशी आहे.