कूळ कायदा दुरुस्तीचा लाभ भाटकारांनाही नाही : देशप्रभू

0
77

कूळ कायद्यातील दुरुस्ती विधेयकाचा भाटकारांनाही फायदा नाही व कुळांनाही फायदा नाही. त्यामुळे सदर विधेयक सरकारने त्वरित मागे घ्यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते जितेंद्र देशप्रभू यांनी काल पत्रकार परिषदेत केली.वरील विधेयक मागे घेईपर्यंत कॉंग्रेसचा लढा चालूच असेल, असे सांगून शेतकर्‍यांच्या हितासाठीच सरकारने कूळ कायदा संमत केला होता. नव्या कायद्यानुसार दिवाणी न्यायालयातील खटल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडेल. व शेतकर्‍यांना न्याय मिळणे कठीण होईल, असे देशप्रभू म्हणाले. वरील वादग्रस्त विधेयक विधानसभेत मांडले असता, कॉंग्रेस आमदारांनी आवाज का उठवला नाही, या प्रश्‍नावर देशप्रभू बरेच गोंधळले. विरोधी आमदारांना अभ्यास करण्यासाठी संधी मिळाली नाही, असे त्यांनी सांगितले.