कुन्नर हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी एफआयआर,पोलीस तपास सुरू

0
17

तिन्ही संरक्षण दलप्रमुख जनरल बिपीन रावत यांच्यासह १३ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या तमिळनाडूतील कुन्नर येथील हेलिकॉप्टर अपघातासंबंधी पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. निलगिरी पोलिसांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १७४ अन्वये एफआयआर नोंदवून, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक यांना तपास अधिकारी नेमले आहे.

तपासाचा भाग म्हणून पोलीस घटनास्थळानजीक ड्रोन कॅमेर्‍यांचा वापर करत आहेत. दरम्यान, अपघातबळींचे मृतदेह कोइंबतूर येथे नेण्यात येत असताना दोन किरकोळ अपघात झाले. येथून हे मृतदेह दिल्लीला नेण्यात येणार होते.