‘कुनो’त आणखी एका चित्त्याचा मृत्यू

0
6

मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात 20 चित्ते आणले होते. त्यापैकी काल आणखी एका मादी चित्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत मृत चित्यांची संख्या 9 झाली आहे. काल सकाळी मादी चित्यापैकी एक ‘धात्री’ चित्ता मृतावस्थेत आढळली. या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून शवविच्छेदन केले जाणार आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नामिबिया आणि दक्षित आफ्रिकेतून 20 प्रौढ चित्ते कुनो अभयारण्यात आणण्यात आले होते. त्यापैकी आतापर्यंत 9 चित्त्यांचा मृत्यू झाला आहे.