कुडतरी येथे ट्रकखाली सापडून दोन तरुण ठार

0
12

रेलाय-कुडतरी येथे काल दुपारी डांबर भरलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडून तन्वेश देवेंद्र नाईक (21) आणि श्रीकर निलंकंठ नाईक (19, दोघे रा. सावर्डे) हे दुचाकीवरील दोघे तरुण जागीच ठार झाले. दुर्दैवाने सदर ट्रक तन्वेश याचा काकाच चालवित होता. मिळालेल्या माहितीनुसार, रेलाय-कुडतरी येथे एक ट्रक हॉटमिक्स डांबर भरून जात होता. त्या ट्रकामागून तन्वेश आणि श्रीकर हे दोघे तरुण दुचाकीवरून निघाले होते. त्याचवेळी त्यांच्या दुचाकीची धडक ट्रकला बसली आणि ते दोघे ट्रकच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले.