गेल्या शुक्रवारपासून राज्यातील पाच खाणपट्ट्यांसाठी जी लिलाव प्रक्रिया सुरू झाली होती, त्यात काल कुडणे येथील खाणपट्ट्यासाठी लिलाव झाला. या लिलावात जिंदाल साऊथ वेस्टला कुडणेतील खाणपट्टा प्राप्त झाला.
इंडियन ब्युरो ऑफ माइन्सने या लिलावासाठी जी सरासरी किंमत निश्चित केली होती, त्यात सर्वोच्च दर 96.65 टक्के या दराद्वारे जिंदाल साउथ वेस्टने हा खाणपट्टा मिळवला आहे.
पहिल्या टप्प्यातील लिलावात चार खाणपट्ट्यांची लिलाव प्रक्रिया पूर्ण झाली होती, तर दुसऱ्या टप्प्यातील लिलावात राज्य सरकारने उत्तर गोव्यातील आणखी 5 खाणपट्ट्यांचा लिलाव पुकारला होता. त्यापैकी पहिला खाणपट्टा म्हणजेच अडवालपाल येथील खाणपट्टा फोमेंतो कंपनीने मिळवला होता, तर आता दुसरा खाणपट्टा जिंदाल साऊथ वेस्टला मिळाला आहे.