कुडणेचा दसरोत्सव उसात्हात

0
70
कुडणेतील श्री महालक्ष्मी कुडणेश्वर मंदिरात होणार्‍या खेन्नावणी कार्यक्रमात सहभागी झालेले भाविक.

साखळी (न. वा.)
कुडणे येथील श्री महालक्ष्मी कुडणेश्वर मंदिरामध्ये विजयादशमीच्या मुहूर्तावर दरवर्षी साजरा होणारा दसरा यावर्षीही मोठ्या जल्लोशात शेकडो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. श्री रवळनाथ मंदिराच्या प्रांगणात संपन्न होणारी खेत्रावणी पाहण्यासाठी आसपासच्या गावातील भाविक मोठ्या संख्येने हजर होते. खेत्रावणी करणारे वीर युवक हातात नंग्या तलवारी घेऊन फेर्‍या घालत असतात. खेन्नावणी झाल्यावर भाविकांकडून सोने लुटण्यात आले. शेवटी श्री कुडणेश्वर मंदिरातील कौलोत्सवाच्या रूपाने आशीर्वाद घेतला.