कुठ्ठाळी-कोन्सुवा राष्ट्रीय महामार्गावर रिक्षा आणि दुचाकी अपघातात दुचाकीचालक फ्रान्सिस डिसिल्वा (50) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकी मागे बसलेला त्यांचा मुलगा एरॉन हा किरकोळ जखमी झाला.
वेर्णा पोलीस स्थानकाचे निरीक्षक नेल्सन कुलासो यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीचालक फ्रान्सिस डिसिल्वा आपल्या मुलासमवेत साकवाळ राष्ट्रीय महामार्गावरून कोन्सूवा येथे जात होते. त्यावेळी वेर्णाहून साकवाळकडे जात असलेल्या रिक्षाची फ्रान्सिस डिसिल्वा यांच्या दुचाकीला धडक बसली. त्यात फ्रान्सिस डिसिल्वा यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला फ्रान्सिस यांचा मुलगा एरॉन डिसिल्वा हा जखमी झाला, त्याला त्वरित मडगाव दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी फ्रान्सिस डिसिल्वा यां मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी इस्पितळात पाठवला.
या घटनेनंतर अपघातस्थळी कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वाझ दाखल झाले. त्यांनी कोन्सूवाकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर सिग्नल व गतिरोधक उभारण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे सांगितले.