>> विरोधी पक्षनेते मायकल लोबोंचे मुख्यमंत्र्यांना आव्हान
विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी राज्यात धर्म परिवर्तन होत असल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा फेटाळून लावला आहे. राज्यातील कोणत्या चर्चमध्ये धर्म परिवर्तन केले जाते, ते मुख्यमंत्र्यांनी दाखवून द्यावे. आपली त्यांच्यासोबत पाहणीसाठी जाण्याची तयारी आहे, असे आव्हान लोबो यांनी काल मुख्यमंत्र्यांना दिले.
मुख्यमंत्र्यांनी राज्यात धर्म परिवर्तनाचे प्रकार घडत असल्याचे वक्तव्य रविवारी कुडणेतील एका कार्यक्रमात बोलताना केले होते. मुख्यमंत्र्यांनी धर्म परिवर्तनाबाबत हवेत गोळीबार केला असावा किंवा वरिष्ठांना खूप करण्यासाठी वक्तव्य केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे लोबो म्हणाले.
दरम्यान, काल मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या एका शिष्टमंडळाने समाज कल्याणच्या अधिकार्यांची भेट घेऊन दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेखालील लाभार्थ्यांचे तीन महिन्यांचे प्रलंबित मानध वितरित करण्याची मागणी केली.