कुटबण जेटी ताब्यात घेणार

0
123

>> मच्छीमारमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

येत्या एक-दोन दिवसांत मच्छीमारी खाते कुटबण जेटी आपल्या ताब्यात घेईल, अशी माहिती मच्छीमार मंत्री विनोद पालयेकर यांनी काल गोवा विधानसभेत दिली. आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल शून्य तासाला कुटबण मच्छीमारी जेटीचा प्रश्‍न विधानसभेत उपस्थित केला होता.

सदर जेटीवर सध्या कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झालेला असून तेथे रोज मच्छीमारांमध्ये भांडणे व मारामारीचे प्रकार घडत असल्याचे आलेमाव यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले. सदर जेटी मच्छीमारी खात्याने ताब्यात घ्यायला हवी. कोर्टाचाही तसा आदेश आहे, असे आलेमाव यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले.

यावेळी हस्तक्षेप करताना वेळ्ळी मतदारसंघाचे आमदार फिलीप नेरी रॉड्रिग्ज म्हणाले की, ही जेटी आपल्या मतदारसंघात असून चर्चिल आलेमाव यांनी जे काही सांगितले आहे ते सगळे खरे आहे. मच्छीमार खात्याने वेळ न दवडता जेटी ताब्यात घ्यायला हवी, असे रॉड्रिग्ज यांनी यावेळी सांगितले.