राज्यातील सर्व कुक्कुटपालन (पोल्ट्री) व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांची पंचायत, नगरपालिका आणि एफडीएकडे नोंदणी अनिवार्य करण्याचा निर्णय मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आल्तिनो पणजी येथे घेतलेल्या एका बैठकीत काल घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी वैयक्तिक कुक्कुटपालकांसह ऑल पोल्ट्री फार्मर्स अँड ट्रेडर्स असोसिएशनच्या सदस्यांची बैठक घेतली.