कुंकळ्ळी नगरपालिका निवडणुकीत कॉंग्रेसचे ज्योकीम आलेमाव यांचे पुत्र युरी आलेमाव यांच्या नेतृत्वाखाली १४ पैकी ९ उमेदवार निवडून आले. आमदार क्लाफायस डायस व भाजपा पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले.
युरी आलेमाव यांनी हा कॉंग्रेस पक्षाचा विजय असल्याचे प्रतिपादन केले. भाजपाच्या आमदारांसहित कित्येक जणांनी आपल्या गटाविरुद्ध प्रचार केला. मुख्यमंत्रीही येथे आले होते, पण लोकांनी त्यांना जवळ केले नाही. त्यामुळे हा जनतेचा विजय आहे असे युरी आलेमाव म्हणाले.
युरी आलेमाव यांनी पालिका मंडळाच्या अध्यक्षपदी लक्ष्मण नाईक तर उपनगराध्यक्षपदी झेवियर अँथनी वाझ यांची निवड केल्याचे जाहीर केले.