कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतील अतिक्रमणावर कारवाई करा : युरी

0
4

नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांना लिहिले पत्र

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत व त्याला लागून असलेल्या सोसियादादे जमिनीवर जमीन हडप करण्याच्या हेतूने कारखान्यांनी केलेल्या अतिक्रमणावर कारवाई करावी, अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे. श्री. आलेमाव यांनी नगरविकासमंत्री विश्वजित राणे यांना त्या संदर्भात तसे पत्र लिहिले आहे. सदरच्या पत्रात, कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत आणि त्याला लागून असलेल्या सोसियादादे जमिनीवर होत असलेल्या अतिक्रमणाकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो, ज्यामध्ये तात्पुरत्या शेड्स, विहिरी बेकायदा कारणासाठी उभारल्या व बांधल्या जात आहेत. या अतिक्रमणाचा विषय गंभीर असून त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

येथील गावकर आणि कुंकळ्ळीकरांसाठी संरक्षित असलेल्या या जमिनीचा औद्योगिक कारखान्यांकडून गैरवापर केला जात असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे.
इथे अतिक्रमणे दिसत असूनही अधिकारी कारवाई का करत नाहीत असा प्रश्न त्यांनी करून संबंधित विभागांना अशा अतिक्रमणांची पाहणी करून कारवाई करण्याचे अधिकार आहेत. पण ते काहीच करत नसल्याचे म्हटले आहे.