कुंकळ्ळीत बगल रस्ता बांधा; पण निवासी घरांना बाधा नको

0
20

कुंकळ्ळी येथील बगल रस्ता (बायपास) बांधताना लोकांची घरे मोडणार नाहीत. तसेच पर्यावरणाचे नुकसान केले जाणार नाही, अशी हमी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी द्यावी, अशी मागणी कुंकळ्ळीचे आमदार तथा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काल केली. गडकरी यांनी या बगल मार्गासाठी 310.92 कोटी रुपये मंजूर केले आहेत हे स्वागतार्ह आहे, असेही आलेमाव यांनी म्हटले आहे.

कुंकळ्ळी येथे होणारी वाहतुकीची कोंडी ही एक मोठी समस्या असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. मुख्य बाजारपेठेतून अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने ही वाहतूक कोंडी होत असून पादचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे. महामार्गापासून काही मीटर अंतरावर विविध विद्यालये आहेत आणि वाहनांच्या रहदारीमुळे शालेय मुलांच्या जीवालाही धोका निर्माण होत असल्याचे आलेमाव यांनी म्हटले आहे. सार्वजनिक बांधकाम खाते तसेच रस्ते वाहतूक मंत्रालय स्थानिकांना विश्वासात घेऊनच या बगल मार्गाचे नवीन आरेखन तयार करेल. या मार्गामुळे निवासी घरांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.