कविता कांदोळकर यांच्यासह काही समर्थकांनी तृणमूल कॉंग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर काल पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर हे देखील तृणमूलमधून बाहेर पडले.
म्हापसा येथे काल किरण कांदोळकर यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी स्वत:सह म्हापशाचे उमेदवार तारक आरोलकर, पर्वरीचे उमेदवार संदीप वझरकर आणि शिवोलीच्या उमेदवार इरो डायस यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची माहिती.
प्रशांत किशोर यांनी भाजपला सत्तेवर आणण्यासाठी तृणमूलचा वापर करून राजकीय खेळी खेळली. आणि निवडणुकीला आठ दिवस असताना त्यांनी गोव्यातून काढता पाय घेतला, असे कांदोळकर म्हणाले. तृणमूलच्या अध्यक्ष ममता बॅनर्जी व अभिषेक बॅनर्जी यांची भेट घेऊन त्यांच्याशी याबाबत चर्चा केली आहे, असेही त्यांनी सांगितले.