किनार्‍यावर पर्यटकांची सुरक्षा‘समुद्री सुरक्षा विभाग’ ठरवणार

0
41
 गोव्यात येणार्‍या पर्यटनांना येथील समुद्रात सुरक्षितपणे पोहता यावे व पर्यटक समुद्रात बुडून मृत्यू पावण्याचे प्रकार बंद व्हावेत यासाठी गोवा पर्यटन खाते ‘दृष्टी’ या संस्थेच्या मदतीने प्रत्येक समुद्र किनार्‍यावरील पोहण्यासाठीचा सुरक्षित समुद्र विभाग निश्‍चित करणार असून पर्यटकांना त्याच ठिकाणी पोहण्याचा सल्ला देण्यात येणार असल्याचे पर्यटन खात्यातील सूत्रांनी सांगितले.

एखाद्या किनार्‍यावरील समुद्रात कुठच्या ठिकाणी पर्यटक बुडत असतात तर कुठले ठिकाण हे अत्यंत सुरक्षित आहे याचा अभ्यास करण्याची जबाबदारी ‘दृष्टी’वर सोपवण्यात आलेली आहे. ‘दृष्टी’ संस्थेचे जीवरक्षक गोव्यातील समुद्र किनार्‍यांवर बुडणार्‍या पर्यटकांना वाचवण्याचे काम करीत असताना. त्यामुळे कुठच्या किनार्‍यावरील समुद्रात पर्यटक कुठे बुडत असतात व कुठला विभाग पोहण्यासाठी सुरक्षित आहे याची कल्पना जीवरक्षकाना असते. त्यामुळे त्यांच्याच मदतीने पोहण्यासाठीचे सुरक्षित विभाग निश्‍चित करण्यात येणार आहेत, असे पर्यटन खात्यातील सूत्रांनी स्पट केले.