किनारी भागातील ध्वनीप्रदूषणाबाबत पोलिसांनी कडक कारवार्ई करावी

0
12

>> उच्च न्यायालयाचे पोलीस महासंचालकांना निर्देश

किनारी भागात वरच्यावर होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाच्या उल्लंघनाची, रात्री 10 वाजल्यानंतर मोठ्या आवाजात संगीत वाजवणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. पोलिसांनी दक्ष राहावे आणि लेखी तक्रारी येण्याची वाट पाहू नये, असे निर्देश काल मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पोलीस महासंचालकांना दिले.

याचिकाकर्त्याचे वकील ॲड कार्लुस फेरेरा यांनी न्यायालयात ध्वनीप्रदूषणासंबंधी व्हिडिओ सादर केले. ध्वनीप्रदूषण नियमांचे उल्लंघन करून रात्री 10 च्या अनुज्ञेय वेळेपेक्षा बाहेर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या वकिलाला पोलीस महासंचालक, हणजूण, पेडणे पोलिसांना भेटून त्यांना रात्री 10 वाजल्यानंतर ध्वनीप्रदूषण करणाऱ्या आस्थापनांची नावे सादर करण्याचा निर्देश दिले आहेत.

रात्रीच्या वेळी होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाला आळा घालण्यासाठी गोवा पोलिसांनी तीन सदस्यीय फिरते पथक तयार केले आहे, अशी माहिती न्यायालयात देण्यात आली आहे.

उत्तर गोव्यातील किनारपट्टीच्या भागांसह घराबाहेर आयोजित संगीत शो किंवा कार्यक्रमांबद्दल केले जातात. कार्यक्रम शो रात्री 8 नंतर किंवा संध्याकाळी 7 नंतर आयोजित केले जातात असे नमूद केले आहे. न्यायालयाने मात्र स्पष्ट केले की जर त्यांच्याकडे परवानगी असेल तर कार्यक्रम चालू ठेवू शकतो, परंतु कोणत्याही परिस्थितीत, रात्री 10 नंतर कोणतीही ध्वनीवर्धक यंत्रणा वापरता कामा नये, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

किनारी भागात रात्री 10 वाजल्यानंतर संगीत वाजविले जात आहे. संगीत वाजविणारे पोलीस यंत्रणेला घाबरत नाहीत, असे आमदार कार्लुस फेरेरा यांनी सांगितले.