किंग्स पंजाबचा अश्‍विन कर्णधार

0
124

किंग्स इलेव्हन पंजाबने २०१८च्या आयपीएल मोसमासाठी ऑफब्रेक गोलंदाज रविचंद्रन अश्‍विनकडे नेतृत्व सोपविले आहे. जानेवारी महिन्यात झालेल्या लिलावात पंजाबने अश्‍विनसाठी ७.६ कोटी रुपये मोजले होते. आयपीएल संघाच्या नेतृत्वाचा अनुभव अश्‍विनच्या गाठीशी नसला तरी तमिळनाडू संघाचे त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनेक सामन्यांत नेतृत्व केले आहे. २००९ ते २०१५ या कालावधीत अश्‍विन चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळला आहे. चेन्नईच्या निलंबनामुळे २०१६ साली त्याला रायझिंग पुणे सुपरजायंट्‌स संघाकडून खेळावे लागले होते. ‘स्पोटर्‌‌स हर्निया’मुळे तो आयपीएलच्या मागील मोसमात खेळला नव्हता.