काही बसफेऱ्या बंद ठेवून कदंब बसचालकांचा संप

0
2

>> चालकांनी केली पगारवाढीची मागणी

स्मार्ट सिटी योजनेखाली पणजी शहरात सुरू झालेल्या कदंब महामंडळाच्या सिटी बसचालकांनी पगारवाढीच्या मागणीसाठी संप पुकारत काल रविवारी दुपारी 1 वाजल्यापासून काही बसेस बंद ठेवल्या. पणजी सिटी बस स्थानकावरून दुपारी 1 वाजता सुटणाऱ्या तसेच 2.30 वाजता सुटणाऱ्या, 3.45 वाजताच्या व 5.30 वाजता सुटणाऱ्या बसेस संपावर असलेल्या बंद ठेवल्या.

कदंब महामंडळाने पणजी स्मार्ट सिटी योजनेखाली मिळालेल्या ह्या बसेस एका खासगी कंपनीला चालवण्यासाठी कंत्राटी पद्धतीवर दिलेल्या असून या बसेसचे चालक हे खासगी कंपनीचे असून कडंक्टर हे कदंब महामंडळाचे आहेत.

या बसेस चालवणाऱ्या खासगी कंपनीच्या चालकांनी कंपनीकडून कमी पगार मिळत असून पगारवाढीच्या मागणीसाठी काल संप पुकारत काही बसेस बंद ठेवल्या. यासंबंधी दै. नवप्रभाशी बोलताना एका तचालकाने सांगितले की आम्हाला कंपनीने 25 हजार रु. पगार देणार असल्याचे सांगितले होत. मात्र, आता प्रत्यक्षात 20,200 रु. एवढा पगार दिला जात असून कंपनी आता पगारात आम्हाला रोज 16 तास काम करावे लागत असून पगार मात्र 20200 रु. एवढाच मिळत आहे. त्यामुळे हा संप पुकारण्याचा निर्णय घेतल्याने संपकरी चालकांचे म्हणणे आहे.