काहीही झाले तरी सीएए मागे घेणार नाही ः शहा

0
166

नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) काहीही झाले तरी मागे घेतला जाणार नाही. हा कायदा कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाच्या विरोधात नाही. त्यामुळे केवळ मुसलमानच नव्हे तर कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल लखनौ येथे केले. ‘सीएए’च्या समर्थनार्थ लखनौ येथे घेतलेल्या जाहीर सभेत शहा बोलत होते. यावेळी सीएएवरून होणार्‍या हिंसाचाराला विरोधी पक्षांना जबाबदार धरले. यावेळी त्यांनी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेसच्या यांच्यावरही शरसंधान केले. या कायद्याबाबत खोटा प्रचार केला जात आहे. पण या कायद्यातील कुठल्याही कलमात तसे असेल तर मला दाखवून द्या. तसेच राहुल गांधी, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव यांनी आमच्याशी जाहीर चर्चा करावी, असे आव्हानही त्यांनी दिले.