कासारवर्णे – पेडणे अपघातात युवकाचा मृत्यू

0
2

कासारवर्णे पेडणे येथे शनिवारी दि. 10 रोजी रात्री झालेल्या अपघातात दुचाकीचालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. एमएच 04 एफएफ 3447 ही महिंद्रा झायलो कासारवर्णेे ते नागझर जात होती. त्याच्या विरुद्ध दिशेने जीए 11 जे 2629 या दुचाकीवरून सुहास मधुकर नारुलकर (45) हे आपल्या घरी जात होते. त्यावेळी सदर कारची दुचाकीला धडक बसली. त्यामुिळे सुहास हे जखमी झाले. त्यांना इस्पितळमध्ये नेत असतानाच त्यांचे वाटेतच निधन झाले.

महिंद्रा झायलो कासारवर्णे ते नागझरच्या दिशेने सुसाट वेगाने चालली होती. त्याचवेळी विरुद्ध दिशेने सुहास नारुलकर हे आपल्या दुचाकीने घरी जात असता या झायलोने त्यांना धडक दिल्याने ते गंभीर झाले. अपघाताची माहिती मिळताच मोप पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. आणि झायलो चालक विशाल गणेश नाईक (23, मुंबई) याला अटक केली. सुहास नारुलकर हे संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयात चालक म्हणून काम करत होते.