काश्मीर पूरग्रस्तांसाठी सरकारने ५ कोटी रुपये देण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला. येत्या सोमवारपर्यंत मदत निधीसाठी खाते उघडले जाईल. त्यानंतर अन्य लोकांनाही या खात्यात निधी जमा करणे शक्य होईल, असे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले.
निधी उभा केल्यानंतर तो निधी पंतप्रधानाच्या निधीत जमा केला जाईल. त्यामुळे या पैशांचा शंभर टक्के योग्य पध्दतीने उपयोग होईल असे पर्रीकर यांनी सांगितले. उत्तराखंडासाठी जमविलेला निधी पुढील पंधरा दिवसांत योग्य त्या संस्थेकडे सुपूर्द करणार असल्याचे पर्रीकर यांनी सांगितले.