काश्मीरात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या

0
8

काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी एका काश्मिरी पंडिताची गोळ्या झाडून हत्या केली आहे. काश्मिरी पंडित पूरण कृष्ण भट्ट यांची शनिवारी जम्मूमधील शोपियान परिसरात दहशतवाद्यांकडून हत्या करण्यात आली. यामुळे परिसरात असंतोष पसरला आहे. काश्मिरी पंडितांकडून टार्गेट किलिंग विरोधात आंदोलने करण्यात येत आहेत. सफरचंदाच्या बागेत जात असताना दहशतवाद्यांनी पूरण कृष्ण भट्ट यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबार ते जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. या वर्षात आतापर्यंत टार्गेट किलिंगमध्ये २४ जणांची हत्या झाली आहे.