काश्मीरमध्ये कमळ फुलले

0
244

>> जिल्हा विकास परिषद निवडणूक

काश्मीर खोर्‍यात झालेल्या जिल्हा विकास परिषदेच्या (डीडीसी) निवडणुकीत विजयाचे खाते खोलले आहे. यावेळी भाजपने नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीसारख्या बलाढ्य स्थानिक पक्षांचा पराभव केला आहे. भाजपच्या ऐजाज हुसेन यांनी श्रीनगरच्या खोमनेह-२ या जागेवर आणि ऐजाज अहमद खान यांनी बंदिपोरा जिल्ह्यातील तुलैल येथे विजय मिळवला. तसेच पुलवामा जिल्ह्यातील काकपोरा जागेवरही भाजपच्या मुन्ना लतिफ यांनी विजय प्राप्त केला आहे. काश्मीरमधील भाजपचा विजय हा मोठा विजय मानला जात आहे.

ऐजाज हुसेन यांनी आपल्या विजयाचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देताना, पंतप्रधानांचे मार्गदर्शन व पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे हे फळ असून त्यामुळे काश्मीरमध्ये कमळ फुलल्याचे म्हटले आहे.

जम्मू-काश्मीरमध्ये २८० जागांसाठी ८ टप्प्यांत मतदान झाले आहे. यात २१७८ उमेदवार रिंगणात आहेत. कलम ३७०, ३५ अ रद्द केल्यानतंर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच निवडणूक होत आहे. दरम्यान, २८० पैकी २३१ जागांचे निकाल हाती आले असून यात भाजपचे ५४ तर गुपकार आघाडीचे ९५ उमेदवार आघाडीवर आहेत.