जम्मू व काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेनजीक भारतीय सैनिक व दहशतवाद्यांचा एक यांच्यात झालेल्या चकमकीत काल चौघे दहशतवादी ठार झाले. तसेच या चकमकीत नाईक नीरज कुमार हा शहीद झाला. वरील भागात अजूनही चकमकी सुरूच असल्याचे सांगण्यात आले. नाईक नीरजकुमार हा या चकमकीत गंभीर जखमी झाल्यानंतर त्याला श्रीनगर येथील इस्पितळात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचे निधन झाल्याचे लष्कराच्या प्रवक्त्याने दिली. ठार झालेले दहशतवादी कोणत्या संघटनेचे आहेत ते स्पष्ट झालेले नाही.