कालेतील दुचाकी अपघातात दहावीची विद्यार्थिनी ठार

0
115

दुचाकीवरील ताबा जाऊन ओहोळात पडली
दुचाकीवरील ताबा सुटून साकवावरून ओहोळात पडल्याने पिल्लगाळ-काले येथील प्रियंका गोपाळ गावकर ही दहावीची विद्यार्थीनी जागीच ठार झाली. काल दु. १२ वा.च्या सुमारास प्रियंका हायस्कुलला जाऊन परत घरी येत असताना हा अपघात झाला.कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रियंका गावकर ही काले येथील सरकारी हायस्कुलची दहावीतील विद्यार्थिनी आहे. हायस्कुलला सुट्टी असली तरी दहावीचा वर्ग चालू असल्याने काल सकाळी ती आपल्या दुचाकीवरून शाळेला गेली होती. व परत दुपारी १२.०० च्या सुमारास ती दुचाकीने पिळगाव काले येथे परतताना दुचाकीवरील ताबा जाऊन साकवावरून दुचाकीसह ओहोळात पडली. त्यामुळे ती जागीच ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर घटनेची माहिती मिळताच कुडचडे स्थानकाचे उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृत्युदेह शवचिकित्सेसाठी मडगाव हास्पिसियोमध्ये पाठवून शवचिकित्सेनंतर मृत्युदेह त्याच्या नातेवाईकाकडे देण्यात आला. पुढील तपास उपनिरीक्षक अर्जुन सांगोडकर करीत आहे. कुडचडे पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यु म्हणून नोंद करण्यात आला आहे.