कालकोंडे येथे रेल्वे मार्गलगत असलेल्या दोन स्टॉल व एका हॉटेलला आग लागून आठ लाखांची हानी झाली. लक्ष्मीनारायण मंदिरालगत रेल्वेच्या जागेत स्टॉल उभारले होते. पहाटे तीन वाजता स्टॉलला आग लागली. त्यात ते जाळून खाक झाले तर अल्लाबक्ष याच्या हॉटेलला आग लागली. अग्नी शामक दलाने तात्काळ आग विझविल्याने अनर्थ टळला.