कारापूर-डिचोलीतील बांधकाम प्रकल्प हा घोटाळा : डिमेलो

0
9

कालापूर, डिचोली येथील महाकाय बांधकाम प्रकल्प हा एक मोठा घोटाळा असून या प्रकल्पाला दिलेले सर्व परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी काल तृणमूल काँग्रेस पक्षाने येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो व पक्षाचे गोव्यातील संयुक्त संयोजक समिल वळवईकर यांनी या प्रकल्पासंबंधी बोलताना, कारापूर येथील ह्या प्रस्तावित महाप्रकल्पामुळे कारापूर येथील निसर्गरम्य असा परिसर नष्ट होणार आहे. तसेच परराज्यातून या प्रकल्पात राहण्यासाठी येणाऱ्या हजारो परप्रांतीयांमुळे परिसरातील शांतता धोक्यात येईल. तसेच या परिसरातील ग्रामस्थ हे आपल्याच गावात अल्पसंख्याक होतील. सदर प्रकल्पाचा बिल्डर हा भाजपचा एक नेता असल्याचे बोलले जात असल्याचे डिमेलो म्हणाले.

या प्रकल्पाला कोणतीही पर्यावरणीय मंजुरी देण्यात आलेली नाही. हा सुमारे 600 ते 700 कोटी रू.चा घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकल्पामुळे राज्यातील पाणी, वीज व इतर संसाधनांवर प्रचंड ताण येणार असल्याचेही डिमेलो यांनी नजरेत आणून दिले व या प्रकल्पाला दिलेले परवाने रद्द करण्याची त्यांनी मागणी केली.