पोळे चेक नाक्याजवळ माजाळी – कारवार महामार्गावर भरधाव पर्यटक स्वीफ्ट कारने वीज खांबाला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ माणसे जागीच ठार झाली. हा अपघात काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास घडला.
कारवार येथील केए – ३० – ए – ११९४ क्रमांकाची पर्यटक स्वीफ्ट कार पोळे चेकनाका ओलांडून सुसाट वेगाने कारवारच्या दिशेने महामार्गावरून जात होती. त्यावेळी चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारची वीज खांबाला जोरदार धडक बसून ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. त्यात कारचालक शंभू निलगिरी व कारवारचे दोघेजण आहेत. सदाशिवगड येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना कारवारच्या जिल्हा इस्पितळात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.