कारच्या धडकेने विद्यार्थी जखमी

0
4

दाबाळ येथे सरकारी प्राथमिक विद्यालयात तिसरीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या मयंक दुर्गेश गावकर या विद्यार्थ्याला कारची धडक बसल्याने तो जखमी झाला. सदर अपघात मंगळवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. त्याला अधिक उपाचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे.प्राप्त माहितीनुसार मंगळवारी सकाळी दाबाळ येथून कोडलीच्या दिशेने कार घेऊन एक महिला जात होती. त्यावेळी विद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्याला कारची धडक बसली. त्यात तो जखमी झाल्याने त्याला खासगी वाहनातून पिळये प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्यात आले. कुडचडे पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला.