कारची धडक बसून 2 वर्षांचा मुलगा ठार

0
8

गृहनिर्माण वसाहत रुमडामळ दवर्ली येथे भरधाव वेगाने निघालेल्या कारच्या धडकेत एका 2 वर्षीय मुलाचा काल मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, कारचालक इर्शाद अहमद हांचीनमनी (39, रा. दवर्ली) हा आपल्या कारने भरधाव वेगाने निघाला होता. तो अंतर्गत रस्त्याने नारायण गॅरेज ते गजा गॅरेज रुमडामळ येथून जाताना रुमडामळ येथे रेहान मेहबूब मुल्ला याला मुलाला कारचा धक्का बसला. त्यात तो गंभीर जखमी झाला व इस्पितळात उपचारासाठी नेत असताना वाटेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कारचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, मायणा-कुडतरी पोलीस तपास करीत आहेत.