कामगाराच्या निधनामुळे संघटनेची पणजीत जोरदार निदर्शने

0
86

आपल्या न्याय मागणीसाठी गेल्या दसर्‍यापासून बेमुदत संपावर असलेल्या नावेली येथील फायबर ग्लास इंडिया लिमिटेड या कंपनीचा कामगार मूळ नाशिक येथील सुभाष दुभाषी याचे बुधवारी रात्री बांबोळीतील गोमेकॉ इस्पितळात निधन झाल्याने अजितसिंग राणे यांच्या नेतृत्वाखालील राजधानी पणजीत तीव्र आंदोलन केले. न्याय मिळेपर्यंत दुभाषी याचा मृतदेह ताब्यात न घेण्याचा निर्धार त्याच्या कुटंबियांनी घेतला आहे.वरील कंपनी गेल्या २० महिन्यापूर्वी बंद झाली होती. त्यामुळे सर्व कामगार बेरोजगार बनले होते. कामगारांना न्याय मिळवून देण्याच्या मागणीसाठी संघटनेने माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. परंतु कामगारांना अद्याप न्याय मिळालेला नाही. संपावर असताना दुभाषी आजारी झाल्याने पंधरादिवसांपूर्वी त्याला इस्पितळात दाखल केले होते. अन्य एक कामगार सोपन काजळे हा कामगार आजारी असून त्याच्यावर नाशिक येथील इस्पितळात उपचार चालू आहेत. सरकार कामगारांच्या भावनांकडे खेळ खेळत असल्याचा आरोप राणे यानी केला. अन्य अनेक कामगार संघटनांनी त्याच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. शेकडो कामगार काल बांबोळी इस्पितळात जमा झाले होते. त्यानंतर श्रमशक्ती भवनातील मजूर कार्यालयात कामगारांनी निदर्शने केली.