कामगारांचा तपशील पोलिसांकडे नोंदवा

0
3

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व कंत्राटदारांना त्यांच्या कामगारांचा तपशील स्थानिक पोलिसात नोंद करण्याचा आदेश दिला आहे. राज्यात बेकायदेशीर कृत्यांना प्रतिबंध करणे, सार्वजनिक सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखणे हे प्रशासनाचे मुख्य उद्दिष्ट असून राज्यात काम करणाऱ्या कामगारांची नोंदणी आवश्यक आहे. कंत्राटदार आणि संबंधित एजन्सींनी या आदेशाचे पालन न केल्यास बीएनएसच्या कलम 223 अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात दिला आहे.