कामकाज निश्चितीसाठी गुरुवारी समितीची बैठक

0
1

गोवा विधानसभेच्या येत्या 6 व 7 फेब्रुवारी 2025 रोजी होणाऱ्या दोन दिवसीय अधिवेशनाचे कामकाज निश्चित करण्यासाठी गुरुवार दि. 23 जानेवारी रोजी सकाळी 11.30 वाजता विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक घेण्यात येणार आहे. या दोन दिवसांच्या अधिवेशनात पहिल्या दिवशी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे. दुसऱ्या दिवशी दिवशी सभागृहाचे कामकाज होणार आहे. त्यात प्रश्नोत्तरे, शून्य प्रहर, लक्षवेधी सूचना आणि खासगी ठराव चर्चेला घेतले जाणार आहेत. केवळ दोन दिवसांचे अधिवेशन आयोजित केल्याबद्दल विरोधी पक्षांतील आमदारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.