कानपूरमध्ये गोळीबारात ८ पोलीस शहीद

0
152

उत्तर प्रदेशमधील कानपूरमद्ये पोलीस पथकावर गुंडांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ८ पोलीस हुतात्मा झाले. विकास दुबे याच्याविरोधात गुन्हा दाखल असून त्याला पकडण्यासाठी हे पोलीस पथक गेले असता दुबेच्या गुंडांनी पोलिसांवर गोळीबार केला. यात डीएसपीसह ८ पोलीस शहद झाले.
दरम्यान, दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री डीजीपींना दिले असून मुख्यमंत्र्यांनी घटनेचा अहवालही मागवला आहे.