जिल्हा पंचायतीसाठी पैंगीण मतदारसंघातून झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या शोभना वेळीप यांनी नजिकच्या कॉंग्रेसच्या उमेदवार रेश्मा वेळीप यांच्यावर २९५८ फरकाने विजय मिळविला. या मतदारसंघातील दोन्ही जागा भाजपाने राखल्या आहेत.
शोभना वेळीप यांना ५५२५ तर रेश्मा वेळीप हिला २५६७ इतकी मते मिळाली. पैंगीण मतदारसंघात कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होईल असा दावा करणार्या कॉंग्रेसचे सचिव महादेव देसाई यांची निराशा झाली आहे. उपसभापती असलेले काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस व माजी मंत्री रमेश तवडकर या दोघांनी शोभना वेळीप यांच्या विजयाची खात्री दिली होती. शोभना यांनी मतदारसंघातील लोलये १५०४, पैंगीण ११८०, गावडोंगरी २२१८ तर खोतीगाव पंचायतीमध्ये ८४८ इतकी मते मिळविली तर कॉंग्रंेसच्या रेश्मा वेळीप यांना लोलये १०८९, पैंगीण ५०३, गावडोंगरी ७७४ आणि खोतीगावमध्ये केवळ १८२ इतकी मते घेता आली. शोभना वेळीप या गावडोंगरी पंचायतीच्या असल्यामुळे त्यांनी गावडोंगरी पंचायतीमध्ये आघाडी मिळविली तर रेश्मा वेळीप या पैंगीण पंचायतीमधील असूनही विशेष आघाडी घेऊ शकल्या नाहीत.
खोला मतदारसंघात भाजपच्या शाणू वेळीप यांनी विजय मिळवला. त्यांना बेतुल (५६०), खोला (१५६९), आगोंद (७५५) तर श्र्रीस्थळमध्ये १३७७ इतकी मते मिळाली. कॉंग्रेसचे राजेश वेळीप यांना बेतुल (१८८), खोला (७६०), आगोंदा (१२९) आणि श्र्रीस्थळ पंचायतीमध्ये (७५५) इतकी मते मिळाली. तिसर्या स्थानावर आम आदमीचे रमी बोर्जिस पोचले आहेत.