काचेच्या भिंतीआडून जाधव आई-पत्नीला भेटले

0
131

हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानी तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांनी काल त्यांची आाई व पत्नीची भेट घेतली. जवळपास ४७ मिनिटे ही भेट चालली. मात्र, इस्लामाबाद येथील पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या कार्यालयात झालेल्या या भेटीत जाधव आणि त्यांची पत्नी तसेच आई यांच्यामध्ये एक काचेची भिंत उभी केली होती.

या भेटीवेळी जाधव यांच्यासमोर एक फोन होता. त्याचा स्पिकर ऑन करून त्यांना बोलण्यास देण्यात आले. काही अंतरावर भारतीय उप उच्चायुक्त जे. पी. सिंह यांना हे संभाषण काचेतून पाहण्याची मुभा देण्यात आली होती. दरम्यान, या भेटीनंतर माणुसकीसाठीच भेटू दिल्याचा कांगावा पाकने पत्रकार परिषदेत केला.