कांपाल स्टेडियमला पर्रीकरांचे नाव देण्याची मागणी

0
250

पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी समविचारी नागरिकांसमवेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची आल्तिनो येथील निवासस्थानी भेट घेऊन कांपाल येथील इनडोअर स्टेडियम संकुलाला दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्याची मागणी काल केली.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी कांपाल स्टेडियमला पर्रीकर यांचे नाव देण्याचे मान्य केले आहे, अशी माहिती आमदार मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
दिवंगत मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कांपाल येथे स्टेडियमच्या बांधकामासाठी भरपूर योगदान दिलेले आहे. त्यामुळे त्या स्टेडियमला दिवंगत पर्रीकर यांचे नाव द्यावे, अशी तमाम पणजीवासियांची मागणी असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या नजरेस आणून देण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन दिले आहे, येत्या १७ जानेवारीला नामकरणाबाबत अधिकृत घोषणा केली जाणार आहे, असे आमदार मोन्सेरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.