काँग्रेसने सोमवारी आपल्या सहाव्या यादीत पाच उमेदवारांची नावे जाहीर केली. पक्षाने राजस्थानमधील चार आणि तामिळनाडूतील 1 उमेदवार जाहीर केला आहे. राजस्थानच्या कोटामधून प्रल्हाद गुंजाल, अजमेरमधून रामचंद्र चौधरी, राजसमंदमधून सुदर्शन सिंग रावत आणि भिलवाडामधून दामोदर गुर्जर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
गुंजाल हे राजस्थानच्या भाजप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या जवळचे आहेत. ते कोटा उत्तरमधून दोनदा आमदार होते, पण गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये गेल्याने हाडोती परिसरात काँग्रेसला फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.
याशिवाय काँग्रेसने काल सी. रॉबर्ट ब्रुस यांना तामिळनाडूच्या तिरुनेलवेली येथून उमेदवार म्हणून घोषित केले आहे. काँग्रेसने आतापर्यंत देशभरात 190 उमेदवार जाहीर केले आहेत.