गुरुवारी कर्नाटकातील बेळगावे येथे काँग्रेस कार्यकारिणीच्या (सीडब्ल्यूसी) बैठकीत 26 जानेवारी 2025 पासून ‘संविधान बचाओ राष्ट्रीय पदयात्रा’ काढण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी पहिल्या दिवशी भाषणे केली, तर सोनिया गांधी यांनी या अधिवेशनाला उपस्थित न राहता पत्राद्वारे कार्यकर्त्यांना संबोधित केले.
या बैठकीनंतर पक्षाचे नेते जयराम रमेश म्हणाले, आमचा विश्वास आहे की भारत जोडो यात्रेने काँग्रेसला संजीवनी दिली आहे. काँग्रेसच्या राजकारणात हा एक महत्त्वाचे वळण ठरले. आम्ही भारत जोडो न्याय यात्राही काढली. आता 26 जानेवारी 2025 पासून आम्ही एक वर्ष चालणारी ‘संविधान बचाओ राष्ट्रीय पदयात्रा’ सुरू करणार आहोत.