काँग्रेस, आपने घेतली महासंचालकांची भेट

0
3

सिद्दिकी उर्फ सुलेमान खान याच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओतून त्याने जे आरोप केलेले आहेत, त्या आरोपांची विनाविलंब चौकशी करावी, तसेच त्याने ज्या पोलिसांच्या नावांचा उल्लेख केलेला आहे, त्या पोलिसांची स्वतंत्र यंत्रणेद्वारे चौकशी केली जावी, अशी मागणी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने काल गोव्याचे पोलीस महासंचालक आलोककुमार यांची भेट घेऊन केली.

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते सुनील कवठणकर व आम आदमी पक्षाचे प्रवक्ते वाल्मिकी नाईक यांच्या नेतृत्वाखाली काल दोन्ही पक्षांच्या एका संयुक्त शिष्टमंडळाने गोव्याचे पोलीस महासंचालक आलोककुमार यांची भेट घेतली व जमीन घोटाळा प्रकरणातील एक प्रमुख आरोपी सुलेमान खान हा पोलीस कोठडीतून पळून जाण्याची जी घटना घडली, त्या घटनेची सविस्तर चौकशी केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

सिद्दिकीने ज्या दिवशी पोलीस कोठडीतून पलायन केले होते, त्या दिवसाची सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.