काँग्रेसने काल गोव्यात लोकसभा निवडणूक प्रचारासाठी आपल्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. त्यात पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी, के. सी. वेणुगोपाल, माणिकराव ठाकरे, अमित पाटकर, युरी आलेमाव, कार्लुस फेरेरा, ॲल्टन डिकॉस्टा, बीना नाईक, गिरीश चोडणकर यांच्यासह एकूण 40 जणांचा समावेश आहे.