राज्यातील लोकसभा दोन्ही जागांबाबत काँग्रेस पक्षाची भूमिका निश्चित करण्यासाठी येत्या 27 जानेवारीला काँग्रेस पक्षाची केंद्रीय निवडणूक छाननी (स्क्रिनिंग) समिती गोव्यात येत आहे, अशी माहिती विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पत्रकारांशी बोलताना पर्वरी येथे काल दिली.
राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा लढविण्याची काँग्रेस पक्षाची तयारी आहे. तथापि, राज्याच्या हिताच्या दृष्टीने विरोधी पक्षांची आघाडी होण्याची गरज आहे. पक्षाचे केंद्रीय नेतृत्वाने गोव्यातील दोन्ही जागांबाबत अजूनपर्यंत अंतिम निर्णय घेतलेला नाही. भाजपच्या विरोधात आघाडी करण्यासाठी केंद्रीय पातळीवर चर्चा सुरू होती. आम्ही दोन्ही जागा लढविण्याची तयारी ठेवली असल्याचे युरी आलेमाव यांनी सांगितले.