कवी शंकर वैद्य यांचे निधन

0
331

मराठीतील ख्यातनाम कवी, गीतकार शंकर वैद्य यांचे काल वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.
दादर येथील एका खासगी इस्पितळात गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार चालू होते. काल दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले तू मला’ ही गाजलेली रचना वैद्य यांची.
पुणे जिल्ह्यातील ओतूर येथे १५ जून १९२८ रोजी त्यांचा जन्म झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासूनच त्यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. ’आला क्षण गेला क्षण’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. तर ’कालस्वर’ हा पहिला काव्यसंग्रह. पहिल्या काव्यसंग्रहानंतर तब्बल २७ वर्षांनी त्यांचा ’दर्शन’ हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. या दरम्यान अनेक मासिके व विशेषांकांतून त्यांचे काव्यलेखन केले. अनेक वर्षे त्यांनी महाविद्यालयांमधून प्राध्यापकीही केली.